संदेश....

बेटी बचाओ..बेटी पढाओ..हर एक माय माझी वाघिण झाली पाहिजे..ईथे तीथे राबाण्याऐवजी ती थेट शाळेत आली पाहीजे. बेटी है देश का कल..बेटी है देश का सम्मान..बेटी बचाओ..बेटी पढाओ..!!
मित्र हो,नमस्कार,ब्लाँग डेव्हलपिंगचे कार्य चालु आहे.लवकरच आपल्या सेवेत दाखल होईल..This Blog Is Under Construction..येथे प्रसिद्ध झालेली बरीच माहिती इंटरनेटवरून घेण्यात आली आहे.जर यातून कुणाच्या copyright हक्क कायद्याचे उल्लंघन होत असेल तर कृपया आम्हाला तात्काळ कळवावे अशा बाबी ब्लॉग या वरून त्वरित काढून टाकल्या जातील

06/10/2025

पूरग्रस्त शेतकर्याच्या पाठीशी नेटिझन्स फौंडेशन परिवार लातूर खंबीरपणे उभे, नेटिझन्स फौंडेशन लातूर चा स्तुत्य उपक्रम पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेणारी शाळा ---------------------------------------------------------- शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी पुरग्रस्त शेतकऱ्यांना फुल न फुलांची पाकळी मदत देऊन शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी खंबीरपणे पाठीशी उभे राहून आज लातूर शहरात पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत फेरी आयोजन, हा नेटिझन्स फौंडेशन लातूर ने खूप स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे,नेटिझन्स फौंडेशन लातूर परिवाराचे खूप खूप अभिनंदन आणि कौतुक या उपक्रमात (चि दिप आमरीत पाटील) माझ्या थोरल्या लेकाला सहभागी करून घेऊन सामाजिक जाणिव जागृती निर्माण केल्याबद्दल नेटिझन्स परिवाराचे मनपूर्वक धन्यवाद पावसामुळे सर्वांच खूप भयानक नुकसान झालंय, त्यातल्या त्यात शेतकर्यांच तर अतोनात नुकसान झालंय, कुणाचे शेत वाहून गेलंय तर कुणाचे पीक पाण्याखाली गेलंय,एकंदरीत शेतकऱ्यांच सर्वस्व या पावसाने पार धुवून नेलंय,शेतकऱ्यांचे स्वप्न,मुलांचे दिवाळीचे कपडे,लेकी बाळींचे नियोजि लग्न खर्च,मुलांचे शिक्षण,कुटुंबाचा आनंद,होते नव्हते ते सर्व वाहून गेले पुराच्या पाण्यात,तर काही शेतकऱ्यांच्या रानात 24 तास साचलेल्या पाण्याने कापूस, सोयाबीन,उडीद,याच्या वाती तयार झाल्यात,या पावसाने शवंतकार्याच्या स्वप्नांना क्षणात होत्याच नव्हतं करून टाकलंय,तळहातावर जपलेल्या फोडाप्रमाणे आणि पोटच्या लेकरं प्रमाणे जपलेले पीक डोळ्यादेखत पाण्यात नाहीस झाल्याने शेतकऱ्यांच्या निशब्द डोळ्यात उरलेत फक्त आणि फक्त अश्रू आणि अश्रूच... शेतकऱ्यां साठी पुढाकार घेणाऱ्या संस्थांना सढळ हाताने मदत करूया,,शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होऊया

14/10/2024

नेटीझन्स फाउंडेशन स्कूल लातूर येथे डॉ.होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा परिक्षेवर आधारित लॉजिक का मॅजिक कार्यक्रम संपन्न.

 
डॉ.होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षे साठी राज्य शासनाची विज्ञान विषयाची पुस्तके आणि पेपर सेट च्या डि.एन.ए चा अभ्यास करा,यश हमखास मिळेल.
 👉   श्री.सुधाकर तोडकर सर,प्राचार्य तथा संचालक,नेटिझन्स फाउंडेशन स्कुल लातूर

दि.13.10.2024 वार रविवार रोजी संध्याकाळी 6 वा नेटिझन्स फाउंडेशन स्कूल लातूर येथे वर्ग नववीच्या विद्यार्थ्यांसाठी फिजिक्स,केमिस्ट्री व बायोलॉजी वर आधारित परीक्षेतील प्रश्न सोडवण्यासाठी विशेष सेमिनार चे आयोजन करण्यात आले होते,शाळेचे संचालक तथा प्राचार्य श्री सुधाकर तोडकर सर यांनी मुलांसोबत संवाद साधताना डॉ.होमी भाभा परीक्षेत येणाऱ्या प्रश्नांचा मुलांनी बारकाईने अभ्यास करावा, राज्य शासनाची विज्ञान विषयाची पुस्तके काळजीपूर्वक अभ्यासावी,या पूर्वीच्या डॉ.होमी भाभा परीक्षेतील प्रश्नपत्रिका सेटच्या डि.एन.ए चा अभ्यास करा,विविध ट्रिक्स,प्रश्नची पूर्वतायरी,प्रश्नांची लेवल समजून घ्या,जास्त वेळ वाया जाऊ देऊ नका,सर्व प्रकारची फॉर्मुले लक्षात ठेवा,जे प्रश्न तुम्हाला अगोदर येतात ते सोपा प्रश्नप्रकार अगोदर सोडवा,शॉर्ट टेक्निक वापरा,टाईम मॅनेजमेंट बाबत विशेष लक्ष द्या,अश्या प्रकारची ट्रिक्स व उदाहरणे अभ्यासली तर हमखास यश मिळेल,असे प्रतिपादन मुलांसोबत संवाद साधताना श्री.सुधाकर तोडकर सर यांनी व्यक्त केले फिजिक्स,केमिस्ट्री व बायोलॉजी या विषयावर आधारित असलेली डॉ.होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षा वर आधारित परीक्षेत येणाऱ्या विविध स्वरूपाचे प्रश्न व प्रश्नाचे स्वरूप या वर श्री सुरज म्हस्के पाटील सर,श्री उग्रसेन चटाप सर,श्री हेमंत श्रीवास्तव सर यांनी परीक्षेला समोरे जाताना मुलांना येणाऱ्या अडचणी बाबत तीनही विषयावर आधारित वेगवेगळे प्रश्न मुलांसमोर सविस्तर सादरिकरण केले. मुलांनी अत्यंत उत्साहाने सेमिनार मध्ये सहभाग नोंदविला,या सेमिनार ला पालकांची उपस्थिती लक्षणीय दिसून आली